नाही तर पैसे परत!
आपल्याला सगळे काही कळते असा मी कितीही आव आणत असलो; तरी मला सगळ्याच गोष्टी कळतात असे नाही. उदाहरणार्थ, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान एखादा प्रकल्प राष्ट्राला अपर्ण करतात म्हणजे नेमके काय करतात? प्रकल्प राष्ट्राला अपर्ण करण्यापूर्वी ती काय त्यांची खासगी मालमत्ता असते का? तसे नसेल तर राष्ट्रीय संपत्तीतूनच निर्माण झालेला प्रकल्प राष्ट्रालाच अर्पण करून ते नेमके काय साधतात? कॅमेर्यासमोर मिरवायची संधी? कोण जाणे! तेवढापुरती तरी माझी मती चालत नाही. स्टॅलीन, हिटलर वगैरेंची बात तर औरच होती. ते स्वतःच स्वतःला सर्वोच्य किताब अपर्ण करून यायचे. पण ती बाब निदान समजण्याजोगी तरी आहे. नंतर आपल्याला कोणी काळे कुत्रेसुद्धा विचारणार नाही याची त्यांना मनोमन खात्री असल्यामुळेच ते तसे करत असावेत. जनतेच्या पैशाने जिवंतपणीच स्वतःचे पुतळे उभारणाया आमच्या 'बहेनजी' देखील कदाचित याच भितीपोटी तसे करत असाव्यात. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल त्यांना मुळीच टोकू नये.
पण ते जाऊ दे. आपल्या लेखी महत्त्वाची आहे ती ही 'समर्पण' वृत्ती! याच समर्पण वृत्तीला अनुसरून, त्यांच्या पैकी कोणीही आजवर न केलेली एक अत्यंत उदात्त कृती मी आज करणार आहे. आज मी हा माझा 'ब्लॉग' राष्ट्राला अर्पण करणार आहे. ''यासाठी एकदा 'जोरदार टाळ्या' झाल्या पाहिजेत'', असे पल्लवी जोशी नक्कीच म्हणाली असती. पण त्यासाठी तुमच्याप्रमाणेच तिनेही हा ब्लॉग वाचणे आवश्यक आहे, एवढीच काय ती किरकोळ अडचण आहे. असो.
या ब्लॉगच्या अभावी ई-विश्र्वाची आमटी आजवर आळणी होती; असा माझा मुळीच गैरसमज नाही. पण माझ्या या ब्लॉगमुळे आता ती अधिकच रूचकर लागेल, एवढी 'गॅरंटी' मात्र मी नक्कीच देईन. नाही तर पैसे परत! अर्थात तशी वेळ माझ्यावर कधीच येणार नाही. कारण मी त्यासाठी तुमच्याकडून मुळात पैसेच घेतलेले नाहीत. बरोबर?
या ब्लॉगमध्ये काय काय असेल?
खरे तर त्यात 'काय असेल' यापेक्षा त्यात 'काय नसेल; याची यादी देणेच कदाचित अधिक सोपे आणि सुटसुटीत ठरेल. पण एक गोष्ट नक्की, कोणीही नाक मुरडावे, असे त्यात काहीच नसेल. असो.
पण असे अंदाज व्यक्त करत बसण्यापेक्षा या पुढे हा ब्लॉग नियमितपणे वाचणे, हेच अधिक चांगले ठरेल.
मग उशीर कशाला?
जे ब्लॉग नियमितपणे 'फॉलो' करायचे, त्या यादीत हा 'ब्लॉग' लगेच नोंदवूनच ठेवा.
रवीन्द्र देसाई.
२ ऑक्टोबर २००९
महात्मा गांधी जयंती.
This is the Best Way to tribute Gandhiji!
ReplyDeleteपल्लवी जोशी ऐवजी आमच्या टाळ्या तुम्हाला चालतील अशी अपेक्शा ...
ReplyDeleteबर वाटल तुमचा ब्लाग पाहून... नियमित वाचेनच मी ...
तुम्ही काहीतरी interesting देणार याची खात्री आहेच...
अभिनंदन!
ReplyDeleteआपण ब्लॉग लिहायला चालू केला म्हटल्यावर आता गूगलला फ्री स्पेस देण्याबद्दल विचार करावा लागेल! पण खरच मला खूप आनंद होत आहे. लोकाना काहीतरी नाविन्यपूर्ण आणि चांगले ऑनलाइन वाचायला मिळेल यात शंकाच नाही.
ऑल द बेस्ट!!
वा !! मस्त आहे तुमचा ब्लॉग !
ReplyDelete